फुटबॉलमधील योगदानाबद्दल फारुख शेख यांचा राज्यस्तरीय सन्मान
फुटबॉलमधील योगदानाबद्दल फारुख शेख यांचा राज्यस्तरीय सन्मान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सम्मानित लियाकत शाह जळगांव जळगाव जिल्ह्यात फुटबॉलच्या विकासासाठी फारुख शेख यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरीय दखल घेण्यात आली आहे. जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख यांना १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शाल आणि प्रमाणपत्रासह वर्ष २०२५-२०२६ साठीचा 'WIFA विशेष सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये फुटबॉलच्या विकासासाठी कार्यरत असलेली पश्चिम भारत फुटबॉल संघटना (WIFA), दरवर्षी या खेळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करते. यावर्षीचा विशेष सन्मान पुरस्कार फारुख शेख यांना व्यक्तिशः प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रमाणपत्रात नमूद आहे की, राज्य आणि जिल्ह्यातील फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाच्या सन्मानार्थ फारुख शेख यांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर आयोजित सत्कार समारंभात, WIFA चे अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते फारुख शेख या...